लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर केले शोषण इन्स्टावर अल्पवयीन मुलीला मैत्री महागात

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे रूपांतर अत्याचारात झाल्याची घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर मैत्री झालेल्या १७ वर्षे ७महिन्यांच्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने विविध ठिकाणी अत्याचार केला. मार्च २०२५ ते मे २०२६ या काळात सिडको आणि औरंगपुऱ्यातील विविध कॅफे आणि सिडकोतील मोमोज सेंटरवर आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. पीडितेने लग्नाची मागणी केली असता आरोपीने तिला मारहाण केली आणि तिचे फोटो व्हायरल करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी १८ जून रोजी सिडको पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार कायदा (झजउडज) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
विशाल महेंद्र तुपे (रा. शताब्दीनगर), असे आरोपीचे नाव आहे, अशी माहिती पोलीस
लग्नास नकार देत जीवे मारण्याची धमकी
आरोपीविरुद्ध 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा
बळजबरीने काढले फोटो
निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. पीडितेचे शिक्षण सुरु असून ती नक्षत्रवाडी परिसरात राहते. २०२५ मध्ये तिची इन्स्टाग्रामवर आरोपी विशालसोबत ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि प्रेमात झाले. त्यानंतर विशालने तिला लग्नाचे आमिष दाखवले. २९ मार्च २०२५ रोजी दुपारी ४ वाजता विशालने तिला बोलावून घेत लग्नाचे आमिष दाखवून टीव्ही सेंटर येथील लॉजमध्ये अत्याचार केला. २९ जुलै २०२५ रोजी विशालने पीडितेला अंबरहिल, हसूल येथील त्याच्या खोलीवर नेऊन अत्याचार केला. त्यानंतर एन १, सिडकोतील कॅफे आणि कॅनॉट येथे बोलावून
▶ पीडितेला औरंगपुरा येथे बोलावून घेतले. ५ मार्च रोजी आरोपी विशालने तेथे कॅफे बंद असल्याने बळजबरी पीडितेचे फोटो काढले आणि व्हायरल करण्याची धमकी दिली, तसेच १० मे रोजी दुपारी साडेचार वाजता पुन्हा टायटॅनिक जहाज कॅफेत बोलावले. तेथे पीडितेने लग्नाची मागणी केली असता आरोपीने नकार देत तिला मारहाण केली. पीडितेने हा प्रकार आईला सांगेल, पोलिसांत तक्रार करेल, असे म्हणताच विशालने माझा बाप सर्व काही बघून घेईल म्हणत उलट पीडितेलाच धमक्या दिल्या, असे फिर्यादीत म्हटले.
विशालने पुन्हा अत्याचार केला. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड करीत आहेत.